After life

आपल्या नेहमी संथपणे एकसुरी चाललेल्या आयुष्यात कधी काही चांगल्या-वाईट घटना घडत असतात. यातूनच आपण आपला जीवनक्रम चालवत पुढे पुढे जात असतो. 

श्रीयुत नवीन काळेंचा एक व्हिडिओ याआधी ही फेसबुक वर बघितला होता,तो आवडला होता म्हणून आजचा व्हिडिओ ही बघितला. 

आजच्या व्हिडिओ मध्ये त्यांनी After life या Netflix वरील मालिकेचे विश्लेषण केले आहे. त्यात ते टोनी या मालिकेतील हिरो ची गोष्ट सांगतात. 

टोनी ची आजारी बायको मृत पावल्यानंतर त्याचा स्वभाव विक्षिप्त होतो. तो आजूबाजूच्या सगळ्याच लोकांशी फटकून वागू लागतो. आजूबाजूला सगळीच सर्वसामान्य माणसे असतात. ऑफिसातील कर्मचारी, पोस्टमन इत्यादी. नंतर स्मशानात त्याला एक थोडी वृध्द स्त्री भेटते, जिचा नवरा मृत झालेला असतो. हळूहळू त्यांची ओळख होते व एका बाकड्यावर बसून ते एकमेकांशी बोलत असतात. 

काळे व्हिडिओत पुढे सांगतात की जशी मालिका पुढे सरकते आणि त्यांचे बोलणे होत राहते, टोनी च्या आणि आपल्याही लक्षात येते की जीवनात छोट्या छोट्या गोष्टीही फार महत्त्वाच्या असतात. रोज उगवणारा सूर्य, गीत गाणारे पक्षी ते झाडावर येणारी फुले!!

जीवनात असे काही extraordinary घडण्याची गरज नसते. आपल्या आजूबाजूलाच जी आपल्याच सारखी सामान्य माणसे असतात तीच आपल्याला आनंद देत असतात.

हे सगळे ऐकून खूपच छान वाटले. खरंच भोवतालचा सुंदर निसर्ग, आपले सखे सोबती किती आपल्याला आनंद देत असतात. तो आपण समजून घेतला पाहिजे व आनंदाने जीवन जगले पाहिजे. आयुष्यात चांगल्या-वाईट घटना घडतच राहणार आहेत. त्यावर काळ हे सर्वोत्तम औषध आहे. 

आजपासून ती मालिका समजून घेऊन बघण्याचा प्रयत्न करणार आहे. 


वीणा कुलकर्णी 🙏🙏


https://www.facebook.com/reel/1979508032744608

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन