विमान विद्या
काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक पोस्ट वाचनात आली. त्यात त्या सद्गृहस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते जसे की, रावणाकडे खरेच विमान होते कां, सीतामाई चे अपहरण करते वेळी ते कुठे उतरवले होते, रामायणानंतर त्याचे काय झाले, नंतरही अवशेष मिळाले का इ.इ.
खरंतर या विषयांवर त्यातील तज्ञांचे एवढे संशोधन उपलब्ध आहे की या प्रश्नांची सुयोग्य उत्तरे समजून घेतली तर नक्कीच मिळू शकतील.
माझ्याकडे डॉक्टर प. वि. वर्तक यांची पुस्तके आहेत. त्यातील वास्तव रामायण या पुस्तकात त्यांनी चित्रांसकट या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे.
वाल्मिकी रामायणातील विमाने खरी आहेत याचे अनेक पुरावे त्यांनी दिले आहेतच. पण आणखीन एक सात आठ पानांचे एक पूर्ण प्रकरण खास 'भोजराजाची विमानविद्या' या विषयावर आहे.
त्या लेखात शेवटी ते लिहीतात, "महाभारत, रामायण, ऋग्वेद या तिन्ही ठिकाणी विमानांची वर्णने आहेत. श्लोक ८४ येथे भोज म्हणतो की पूर्वीचेच हे ज्ञान मी संकलित करत आहे."
पुढे ते म्हणतात, तात्विकतः प्राचीन भारतीय विमान विद्या त्यांनी पुनः प्रकाशात आणली आहे.
या विषयाला अनुसरून डॉक्टर वर्तकांच्या अभ्यासावर आधारीत श्री. नीलेश ओकांची अभ्यासपूर्ण व्याख्याने आपल्याला ऐकायला मिळतात, वैचारिक किडा या युट्यूब वाहिनीवर !!!
यातील दुसऱ्या भागात ते रामायण, महाभारतातील वाहने या विषयावर खूप सखोल माहिती देतात.
हे सर्व वाचून, ऐकून रामायण, महाभारत इत्यादी भारतीय ग्रंथसंपदा भाकडकथा नसून आपला गौरवपूर्ण इतिहास आहे याची खात्री पटते आणि सार्थ अभिमान वाटतो.
यापुढे जाऊन एक नमूद करावेसे वाटते नालंदा, तक्षशिला विद्यापीठांचा आक्रमकांनी विध्वंस केला नसता तर भारताकडे केवढी अपार ग्रंथसंपदा असती याची आपण कल्पना ही करू शकत नाही.
रामकृष्ण हरी 🙏🙏
वीणा कुलकर्णी
आक्रमकांनी आपल्या अपार ग्रंथसंपदेचा नाश केला तसेच शिक्षण व्यवस्थेचीही पद्धतशीर वाट लावली आणि आपण स्वत्वच हरवून बसलो ......
ReplyDeleteएकदम बरोबर. धन्यवाद
ReplyDelete