शुभ दीपावली 🪔
लखलखत्या दिव्यांचा, आनंदाची लयलूट करणारा ,सगळ्यांच्याच आवडीचा दिवाळीचा सण येत आहे. म्हणजे खरंतर तो तसा आलाच आहे. नवीन कपडे,रांगोळी,फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. त्याआधी तर घराची साफसफाई सुरु झालीच आहे. पंखे चकाचक पुसून स्वच्छ झाले आहेत. माळ्यावरून आकाशकंदीलाचा आराखडा, उरलेल्या रांगोळ्या, लाईटच्या माळा,पणत्या काढून झाल्या आहेत. दिवाळीचे फराळ बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. अशी सगळी मजा घराघरात चालू आहे. अर्थात या दमणूकीतही एकप्रकारचे मानसिक समाधान असते. दहा नोव्हेंबर ला आमच्या जवळच्या मालाड इनफिनीटी माॅल मध्ये सकाळी साडेसहा वाजता दिवाळी पहाट कार्यक्रम आहे. हृषिकेश रानडे, शरयू दाते यांचा. त्याची ही तिकीटे काढून ठेवली आहेत. असा हा आनंदाचा दिवाळी सण सगळ्यांच्याच आयुष्यात आनंदाची,सुखसमृध्दीची भरभराट घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर्वांना पुनः एकदा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 वीणा कुलकर्णी