Posts

Showing posts from October, 2026

अप्रतिम कार्यक्रम

डोळ्यांचे पारणे फेडणारा... डोळ्यांची पापणी ही न लववता पहावा असा कार्यक्रम म्हणजे... हिंदी सारेगमप!!! झी टीव्हीवरील दर शनिवार रविवार रात्री नऊ वाजता लागणारा सुरेल कार्यक्रम.  मराठी सारेगमप चा धागडधिंगा, खोटी रडारड बघून, तो कार्यक्रम पहाणे दोन भागांनंतर पूर्णपणे बंद केले आणि परत लावण्याचे धाडस ही केले नाही. आता त्यात काही चांगला बदल झाला असेलच तर कल्पना नाही, मी बघत नाही त्यामुळे बोलण्याचा अधिकार नाही. असो. हिंदी सारेगमप हा खरोखर खूपच दर्जेदार कार्यक्रम आहे. श्रेयस तळपदे च्या उत्तम सूत्रसंचालनाने खुलणारा, शंभर हून अधिक वादक, सह गायकांनी सजलेला आणि त्यावर कडी करणारे दर्जेदार परिक्षक असा कार्यक्रम पुनः पुनः पहावा असा आहे. मुख्य आवडलेली गोष्ट म्हणजे वादक, गायक सगळेच या कार्यक्रमात सहभागी असणारे सभासद मनापासून हसत, आनंद घेत हा कार्यक्रम सादर करत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम बघताना अतिशय सुंदर अशी सकारात्मकता आपल्या अंगात संचारते व खूप आनंद देते. या कार्यक्रमात भाग घेतलेल्या स्पर्धेक मुलांबद्दल तर काय बोलावे ? एकाहून एक सरस टपोरी मोत्यांची गुंफलेली माळच जणू!!! बेला शेंडे, श्रेया घोषाल इ.इ...

काळजी

आमच्या ऑफिसात माझा एक असिस्टंट होता त्याने माझा भिडस्त स्वभाव बघून, समोरच्याला नाही कसे म्हणायचे हे शिकवले. आमचे काम युजर्सना विविध सेवा पुरविण्याचे होते. सगळ्यांच्या सगळ्याच गरजा नेहमी पूर्ण करणे अशक्य असते त्यावेळी त्याच्या सल्ल्याचा खूप उपयोग होत असे. पण त्याला एक वेगळीच खोड होती, सतत काळजी करण्याची !! तो टॅक्सीत वगैरेही पुढे सरकूनच बसत असे, अपघात झालाच तर पटकन उतरता यावे असे. तर घरीही त्याने एक लाकडी टेबल ठेवले होते, भूकंप झाल्यास पटकन त्याच्याखाली जाता येईल असे !! एखाद्याच्या सवयींवर काही बोलण्याचा अधिकार मला नाही पण मला ही या सगळ्यात खूप शिकता आले. काळजी, बिनधास्तपणा आणि निष्काळजीपणा या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुले, संसार, नोकरी, पैसा इ.इ. गोष्टींची काळजी नक्कीच करावी व अनपेक्षित गोष्टींबद्दल ही योग्य तेवढा विचार करून ठेवावा. पण बिनधास्तपणा नक्कीच नसावा. काही होईल तेव्हा बघू अशी बेफिकीरी निश्चितच नसावी. आणि काहीच होणार नाही असे निष्काळजीपणे केलेले दुर्लक्ष तर अजिबात नसावे. अर्थात साधारणपणे आपण नकारात्मकपणे काळजी करतो त्यापैकी नव्वद टक्केही काहीही वाईट घडत नाही. अगदीच थोडे बहु...

जीवन

सकाळची कोवळी उबदार उन्हे तर कधी धगधगीत उष्णतेचे नकोसे वारे तर कधी सरीं वर सरींची हिरवीगार बरसात!! निसर्ग चक्र चालूच असते जसे आपले जीवन चालू असते.  माणसांच्या जीवाला कधी उसंतच नसते. कधी ऑफिसातल्या तर कधी घरातल्या विवंचना तर कधी आनंदाचे उधाण. जीवनात सतत काही ना काही घडतच असते. मग माणसे विचार करतात एवढे काम होऊदे मग आहेच मजा.  सकाळ उजाडली की संध्याकाळ, रात्रीची वाट बघायची. आज उजाडला की उद्या कधी होतोय. पाऊस कधी संपतोय आणि थंडी कधी येते याची वाट बघत रहातो.  मग जगायचे कधी ? एकदा सगळे मार्गी लागले, सगळे एकदा परफेक्ट झाले की आरामात जगूया असे माणसे स्वतःशी म्हणत राहतात.  पण सगळेच एकदम परफेक्ट असे कधी होते का ? आठवून बघा, खरंच असे कधी झालेय का ? घरी ओके असेल तर ऑफिसात कुरबुरी असतात. जर दोन्हीकडे ऑल इज वेल असेल तर तब्येत डोके वर काढते. म्हणून आनंदाने जगण्यासाठी वाट बघू नका, मुहूर्त काढत बसू नका. जगात असा कुठलाही प्राॅब्लेम नाही ज्यावर उत्तर नाही. वेळेनुसार सगळे ठीक होत जाते. म्हणून थ्री इडियट्स मध्ये सांगितल्या प्रमाणे हृदयावर हात ठेवा आणि म्हणा...ऑल इज वेल आणि बघा कसा हुरूप य...

बोलणे

आपले वय वाढू लागल्यावर आपण जरा जास्तच बोलू लागतो का ? की वाॅट्स ॲप युनिव्हर्सिटीने सांगितले की बोलत रहा, मनात काही ठेवू नका...म्हणून बोलतो आपण. असो,तर माझा तरी अनुभव आहे मी खरंच जरा जास्तच बोलू लागले आहे अगदी समोरच्याला बोलू न देता, त्याचे बोलणे न ऐकता !!! नाही, हे अजिबात खरे नाहीये…मी जरा मजा केली. तब्बल बत्तीस वर्षे पब्लिक सर्वंट म्हणून काम केल्यावर काय हिंमत आहे,समोरच्याचे न ऐकण्याची !! या संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात. काही अबोल तर काही बोलकी तर काही अती बडबडी.  काहीजण असे असतात, तुमचे बोलणे मनापासून ऐकतात. तुम्हाला अजून जास्त बोलायला उद्युक्त करतात. तुमच्या बोलण्यात रस दाखवतात, तुमच्या सुख-दुःखावर चर्चा करतात. तर काही महाभाग तुम्हाला बोलूच देत नाहीत. स्वतःचेच घोडे पुढे दामटत राहतात. तर काही असेही असतात त्यांचे तुमच्या बोलण्याकडे लक्षच नसते तर काही अती भोचक असतात. काही टोचून बोलतात तर काही माहिती काढून घेतात आणि उलटीच पसरवतात. असो. तर असे माणसांचे विविध नमुने आपल्याला भेटत असतात. त्यातून आपल्याला खूप शिकता येते. कुठे, कधी, कसे व केवढे बोलायचे याची अनुभव...