अनामिक भिती

      नरसापूर मधील चिमुरडी च्या भयंकर अत्याचार दुर्घटनेतून जरा सावरतोय तेवढ्यात ट्रेन मधील मयांक लोहार आणि लोहगडावरील केतन अगरवाल दुर्घटना लागोपाठ डोक्यावर आदळल्या.

      मन विषण्ण झाले आणि विचारशक्ती सुन्न पडली. आणि पुनः एकदा त्या अनामिक भितीने डोके वर काढले. काय चालले हे सगळीकडे ?? अशिक्षिता पासून सुशिक्षिता पर्यंत सगळे तसेच...कुणीच सुसंस्कृत नाही का ? या सगळ्यात एक वाईट गोष्ट घडताना दिसत आहे ती म्हणजे माणसांचा एकमेकांवरील विश्वास ढळू लागला आहे.

     माझ्या यजमानांचे निधन झाल्यानंतर घरात आम्ही दोघीच.. मी आणि माझी मुलगी. रात्रंदिवस बेचैनी असे. तरूण मुलगी आणि मी ही शेवटी बाईच !! आयुष्यात कधी नव्हे ती बाईपणाची भिती वाटत असे तेव्हा... अनेक वर्षं नोकरीनिमित्त घराबाहेर पडून ही...

     बॅक, शेअर्स इत्यादी कामासंदर्भात कधीतरी कुणी येत असेच. तसेच  प्लंबर, इलेक्ट्रिशियन सारख्या माणसांची ही गरज असतेच. 

     अर्थात चांगलीच माणसे मिळत गेली आणि भितीही नाहीशी झाली. 

  पण नुसता मोबाईल ला धक्का लागला तर माहीम स्टेशन वरच्या मारण्याच्या घटना ऐकल्यावर मन धस्स होते.

     पण दिवस निघत गेले ती अनामिक भितीही नाहीशी झाली. एकतर चांगलीच माणसे मिळत गेली आणि चांगल्या माणसांची साथही लाभली. मुद्दाम उल्लेखनीय म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड, मृणाल आणि राजेश कोळवलकर जे माझ्या सोबतीला मी बोलावल्या बरोबर हजर असत. अजून खूप नावे घेता येतील, ज्यांनी त्या अनामिक भितीतून बाहेर पडायला मदत केली. 

      कधीतरी प्रसंगानुरूप वाटणारी भिती तात्पुरती असते. माणसांवर विश्वास ठेवला की त्या विश्वासाला ती पात्रच ठरतात. अजून काय हवे आयुष्यात? 

      पण असे भयानक प्रसंग ऐकले, वाचले की भिती ही वाटतेच. ओमकार साधना हा त्यावर प्रभावी उपाय आहे. 

हरी ओम 🙏🙏


वीणा कुलकर्णी.

Comments

  1. चांगल्या माणसांचे प्रमाण जास्त असल्यामुळेच आपला "विश्वास" टिकून आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन