Posts

नकार

     माझा एक सहकारी होता. तो मला नेहमी सांगायचा की 'नाही' म्हणायला शिका.       आम्ही public service देण्याच्या ठिकाणी काम करत होतो. Users आपली गाऱ्हाणी, मागण्या  घेऊन येत असत. सगळ्यांच्या सगळ्याच मागण्या पूर्ण करणे शक्‍यच नसे. त्यामुळे त्याचे सांगणे पटण्यासारखेच होते पण नाही म्हणणे मला कठीण जात असे.      आता विचार केल्यावर पटते की नाही म्हणणे कधी कधी खूप गरजेचे असते. जे न करून आपण आपल्यालाच त्रास करून घेतो.       खरंतर लहानपणापासून आपल्याला नकारघंटाच तर वाजवायला शिकवलेले असते. सगळ्या लहान मोठ्या मुलांना हे करू नको, ते करू नकोस असेच शिकवले जाते. काय कर ते कुणीच सांगत नाही.       कुठेतरी वाचले होते की म्हणून म्हणे आपल्याकडे शास्त्रज्ञ तयार होत नाहीत कारण जिज्ञासाच मारून टाकली जाते. ते असो.      एवढी नकारघंटा वाजवायला शिकवूनही नाही म्हणणे आपल्याला कठीण जाते ते जातेच.      एवढेच कशाला Election मध्येही आपण NATO वापरत नाही.     बहुतेकांचा स्वभाव  जन्मतःच भिडस्त असत...

श्रवणभक्ती

     ऐकणे ही एक कला आहे. सर्वसाधारणपणे सगळ्यांना बोलायला आवडते. ऐकायला नाही.      खरतर देवाने आपल्याला एक तोंड व दोन कान दिले आहेत. कारण जेवढे बोलतो त्याच्या दुप्पट ऐकण्यासाठी !!!!         पण आपण काय करतो समोरच्याचे बोलणे आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठीच ऐकत असतो. ऐकता ऐकता ही काय बोलायचे हा विचार करतच ऐकत असतो.        खरतर कधीकधी समोरच्याला उत्तर, सांत्वन, दिलासा असे काहीच नको असते. फक्त त्याला आपले मन हलके, मोकळे करायचे असते. त्याचे बोलणे, मनातली खदखद कुणीतरी फक्त ऐकून घ्यावी एवढेच त्याला वाटत असते.पण होते काय ऐकणारा एक तर नीट ऐकतच नाही अथवा उपदेशाचे डोस देतो अथवा स्वतः विषयीच बोलू लागतो.        खूप कमी लोक भेटतात जी मनापासून समोरच्याचे ऐकून घेतात, कसलाही सल्ला न देता !!!!        सुखाचे क्षण सर्वांसोबत वाटता येतात पण दुःख मात्र आपण आपल्या जिवलगांशीच बोलतो. त्यावेळेस उपदेशाचे डोस, सल्ले, पैसा,मदत या कशाचीच अपेक्षा नसते. ती गरज ओघाने येणार असतेच पण त्याक्षणी कुणीतरी आपले बो...

आनंद

        गणपती गजानन आले आहेत. सगळीकडे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. सहाजिकच ह्या आनंदाचा संसर्ग सगळ्यांनाच होतो व सगळीकडे आनंदी वातावरण पसरते. देवळातला जादूचा लोलक अलगद हातात येतो.         आनंद ही मनाची भावना आहे. आजूबाजूला जर आनंदी वातावरण असेल तर आपणही त्यात नकळत सामिल होऊन जातो.        एकंदरच सगळ्या भावना मनाच्या कारक आहेत. मन आनंदी तर तुम्ही आनंदी !!!        एक म्हण आहे.... "Body in abyss, heart in paradise"        म्हणजेच तुमची Body/शरीर कितीही खड्ड्यात/ पाताळात/ abyss मध्ये गेलेली असेल पण तुमचे मन / heart जर स्वर्गात / paradise मध्ये असेल तर तुम्हाला खड्ड्यातही सुंदरता, आनंद मिळू शकतो.        थोडक्यात काय बाह्य गोष्टींवर आपला आनंद अवलंबून नसतो तर आंतरिक दृष्ट्या  जर तुम्ही सुखी, समाधानी असाल तर बाह्य गोष्टींनी काहीही फरक नाही.        हे सगळे पटते, वाचायला, ऐकायला आवडते मग घोडे कुठे अडते? तर........मन !!!!!        ...

कुटुंब

     माझी एक मैत्रीण आहे. सेवानिवृत्त होऊन पाच सहा वर्ष झाली. सहजच कधीही फोन करा, ती बिझीच असते. खरेतर मला त्या गोष्टीचा कधीकधी हेवाही वाटतो.      पण कधी तिची कीवही येते. कारण ती म्हणते, माझा संसार झाला, आता मुलाचा करत आहे.     कारण आम्ही नोकरीला जात होतो, तेव्हा सकाळी आठची मालाडलोकल पकडत असू. त्यामुळे डबे, घरचे सगळेच आवरण्यासाठी सकाळी पाच ला उठणे अपरिहार्यच होते. नंतर संध्याकाळी ही जेवण, मुलांचा अभ्यास, इतर कामे आलीच. शनिवार, रविवार बाकी पसारा आवरण्यात जात असे. एकंदर बिझी असे दिवस होते. वय होते, उमेद होती, मजा वाटत होती सगळे करण्यात!!!!       पण आता तिचा दिवस अजूनही सकाळी पाचला च सुरू होतो. मुलाचा, सुनेचा डबा बनवण्यात मदत करण्यासाठी !! नंतर दिवस जातो नातवंडाचे करण्यात  !!      ती म्हणते निवृत्ती मिळलीच नाहीये.     एकंदर काय एक पुती रडते आणि सात पुतीही रडते. कारण माझा मुलगा ऑस्ट्रेलियात असल्याने मी तशी बिझी नाहीये. घरातली थोडीफार कामे केली की दिवस तसा रिकामाच असतो. अर्थात घरातली कामे, वाचन,  O...

लोलक

देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक  हरवला माझ्या हातून, तेव्हा डोळ्यातली फुलपाखरे उडून गेली  आणि विझली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुले, आता गवत नुसतेच हिरवे दिसते,  आभाळ नुसतेच निळे, घराघरांना, माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याचा रेषा. एकदा एक पोर आली उड्या मारीत  हातांचे पंख पसरून, डोळे विस्फारून  खिदळत मला म्हणाली, ‘ गमत बघ, गवत हिरवे नसते, आभाळ निळे नसते, आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनवलेली, माहीत आहे तुला?’  माझा लोलक हिला कुठे सापडला? देवळातल्या झुंबराला किती लोलक आहेत अजून? - शांता शेळके        लोलक ही शांताबाई शेळके याची कविता एकदा सलील कुलकर्णी यांनी झी मराठी वरील एका गाण्याच्या कार्यक्रमात म्हणून दाखवली होती. व सांगितले की तुमचा लोलक कोणत्याही परिस्थितीत  हरवू देवू नका वगैरे वगैरे !!!!         पण आपल्या आयुष्यात नेहमीच सुख असते का की आकाशही रंगीत दिसावे ?? कधीकधी तर कठीण प्रसंग येतात तेव्हा तर आपण विसरूनच जातो की आपल्याकडे लोलक आहे.         मग कसे बरे लोलक सांभाळून ठेवायचा...

अनमोल!!

      तामिळनाडूतील कुंभकोणम जवळच्या शिवमंदिरात दहा पायऱ्या आहेत. ज्यातून सारेगमपधनी आणि ओमकार ध्वनी उमटतात. तसेच हंपी येथील विठ्ठल मंदिरात ही सारेगमप स्वर निर्माण करणारे खांब आहेत.       अशा एकाहून एक अद्भुत वास्तू भारताभर पसरल्या आहेत.अतिशय अनमोल असा ठेवा भारतात आहे तेवढा अन्य कुठे सापडत नाही.        पण दगडातून ही संगीत निर्माण करणाऱ्या भारत देशात आता त्याच अद्वितीय वास्तू , लोकांनी दगड मारून आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे , जाळीमध्ये बंदिस्त करून ठेवण्याची वेळ आली आहे.        एकंदर विचार करता, त्या मानाने दक्षिण भारतातील अशी अनमोल स्थळे सुरक्षित राहिली कारण आपले शिवाजीमहाराज!! उत्तरेत पसरलेले मोंगली वादळ या राजाने मध्येच थोपवून ठेवले व दक्षिण भारत थोड्या  प्रमाणात का होईना विध्वंसा पासून वाचला.       अशा अनमोल वास्तू आहेत त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहेच पण त्या आपल्यापासूनच सुरक्षित आहेत कां ? हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.       आपल्या संस्कृतीतील सभ्यता कधी लोप पावली ...

चांगुलपणा...

           माझ्या मुलीने OTT Platform चा एक अजब खजिनाच जणू काही माझ्या समोर उघडून दिला आहे.         Sony liv वर हर्षद मेहता स्कॅम वर आधारित मालिका बघण्यात आली.हा स्कॅम ज्यांनी शोधला त्या सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांच्याच पुस्तकावर आधारित ही मालिका असल्यामुळे खरेखोटेपणा बद्दल दुमत नसावे.         मालिका जशीजशी पुढे सरकते तसेतसे हर्षद मेहता हा माणूस गुन्हेगार न वाटता , system चा बळी वाटू लागतो. कारण तो जर गुन्हेगार तर त्याला साथ देणारे बॅंक अधिकारी व त्याच्या कंपनीत पैसे गुंतवणारेही तेवढेच दोषी वाटू लागतात.  असो. आजचा विषय हा नाहीतर एकंदर सगळीकडेच सध्या खोटेपणाचा विजय होताना दिसतोय हा आहे.         चांगुलपणा हरत आहे का ??? खरोखर कलियुग अंतिम चरणात आले आहे का ?        कारण सध्या आजूबाजूला बघितले तर चांगुलपणाला किंमत उरली नाहीये असे दिसते.चांगल्या माणसांचेच वाईट होताना दिसत आहे. खरेपणाला कोणीही विचारताना दिसत नाही.        माझ्या मुलीने Good place नावा...