सुख....

     मनापासून डोळे मिटून शांत बसा व आठवा, 'एकदम  सुखी-समाधानी वाटलेला क्षण'...आठवा, मस्त आनंदी अनुभवलेला शेवटचा क्षण!!!!!

    आठवला ???? बघा हं नाही म्हणून सोडून देऊ नका...परत प्रयत्न करा प्लीज....

   सुख-समाधान म्हणजे नक्की काय असते ???

   लहान बाळाचे गोड हास्य, चवदार  आमटीचा भुरका, कुंडीतील गुलाबाला खूप दिवसांनंतर आलेले फुल, मित्रांच्या मैफिलीत अनुभवलेला मोकळेपणा.......असे कितीतरी छोटे छोटे सुखदायक क्षण, जे सहज विस्मरणात जातात आणि आपल्याला खंत वाटते, आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण हरवले की काय???

      खरंतर ते हरवलेले नसतातच, ते आपल्यातच असतात व ते जपून ठेवायचे असतात, मनापासून, मनासाठी !!!

      मग असे सुखी, आनंदी ,समाधानी क्षण भरपूर आठवतील !!!

     आता आठवा बरं, सगळ्यात आनंदायक क्षण !!!

     मग झाली ना सुखी विचारांची भाऊगर्दी एक एक आठवता आठवता......

  अगदी लहानपणापासून ते दहावी झाल्यापासून, लग्न वगैरे वगैरे कितीतरी.....आपल्याला मुले झाली, त्यांचे पहिले पाऊल, पहिलाच बोबडा शब्द, संसारातील-नोकरीतील आनंदाचे क्षण, नातेवाईक-मित्रमैत्रिणीं च्या सहवासातील हसरे क्षण......

    खूप म्हणजे खूपच, आठवावे तरी कित्ती एव्वढ्ढे सुखाचे क्षण!!!!!!

    खरंच एवढे पुण्य केलेले असतेच प्रत्येकाने की घरबसल्या असे सुखाचे क्षण मिळत असतात. फक्त ते शोधावे लागतात. आणि मनापासून शोधले की सापडतातच!!!!!

    सुखी माणसाचा सदरा सगळ्यांकडेच आहे हो...फक्त तो जाणीवेत नाहीये. बघा स्वतःला स्वता:त शोधून, डोळे बंद करून, शांतपणे विचार करून....मग बघा कसे सुखाचे क्षण आजूबाजूला उडताना दिसतील...

   म्हातारीच्या (सावरीच्या) कापसा सारखे.....!!!

   पण ते पकडायला, धरून  ठेवायला कठीण असतात हे मात्र विसरून चालणार नाही आणि मग मात्र मनापासून त्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करायचा,प्रत्येकाने स्वत:साठी, स्वत:च्या सुखासाठी !!

  आणि असा आनंदाचा/सुखाचा क्षण आठवला किंवा आयुष्यात आला की एक छानशी ऊडी मारून, गिरकी घेऊन साजरा करायला विसरू मात्र नका.. ! !

वीणा कुलकर्णी 🙏

Comments

  1. Vasant Govind PhadkeApril 11, 2022 at 2:43 PM

    खूपच छान !

    ReplyDelete
    Replies
    1. तेच आठवत बसलो होतो की आयुष्यातील गेलेले आनंदाचे क्षण.आणि वीणा तुम्हाला सांगतो अस वाटत दुःखाचे क्षण खूप कमी असतील कारण आज पर्यंत आपण ह्या अँगल ने विचार केलाच नव्हता.फक्त आणि फक्त आनंदाच्या क्षणाचा विचार करत बसलो तर दुःखाचे सर्व क्षण विसरून जातील आणि मग आनंदच आनंद.धन्यवाद वीणा एक नवीन रस्ता सापडला आनंद शोधण्याचा .खूप मस्त लेख असा म्हणण्यापेक्षा सुख शोधण्याचा नवीन मार्ग👏👏👏🌹🌹🌹🙏🙏🙏

      Delete
    2. दोघांनाही छान काॅमेंट्स बद्दल धन्यवाद 🙏

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १२

अभंगाचा गाथा १०