अभंगाचा गाथा ८
अंतरिचीं घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळे ॥ तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥
देव भक्ताच्या अंतःकरणातील भक्तीची गोडी आणि भाव पाहतो. देव भक्ताचा नातेवाईक झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात. आपल्या जवळ जे वैभव आहे ते निर्मळ मनाने स्वीकारावे.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा भक्तांबरोबर देव भोजन करतो व आपल्या प्रेमाचा वर्षाव करतो.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥
वीणा कुलकर्णी 🙏🙏
राम कृष्ण हरी
ReplyDelete