अभंगाचा गाथा ९

        पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥ जेथें तेथें देखे तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥


       देवा, आम्हाला जे हवे आहे ते सर्व मिळाले आहे. आता दुसरी भावना आमच्या मनात येऊ देऊ नकोस.

       जेथे पहावे तेथे तुझीच पाऊले दिसतात. विठ्ठला, त्रिभुवनात तूच संचारत आहेस. भेदाभेद आणि संवाद हे सर्व भ्रम आहेत,आम्हाला त्याच्याशी वाद होऊ देऊ नकोस.

       तुकाराम महाराज म्हणतात,  सगळ्यात छोटा असा अणू त्यात ही तू आहेस. आणि तसाच तू आभाळाहूनही मोठा आहेस.


बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, 

श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. वसंत गोविंद फडकेJune 19, 2024 at 6:17 AM

    सुप्रभात!
    जय जय राम कृष्ण हरी !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १२

अभंगाचा गाथा १०