इकिगाई

  आमच्या घरासमोरच्या इमारतीत मेंटेनन्सचे काम सुरू होत आहे. त्यासाठी बांबू बांधणारे कामगार त्यांचे काम करत आहेत, नेहमीप्रमाणेच.. बिनधास्त!!!! 

   त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,ते कामगार इतक्या उंचीवर  इतके बिनधास्त वावरत होते की अगदी मध्येच एखाद्या बांबूवर झुलत बसून फोनही पाहिला एकदा एकाने असे वाटले, हे सगळे पहाताना इकडे माझ्याच काळजाचा ठोका चुकत होता.

   हल्ली सगळीकडेच सोशल मिडीयाचा अतिरेक झाला आहे. व्हिडिओ, रिल्स बघता बघता तुमचा वेळ कधी, कुठे आणि कसा जातो याचा पत्ताच लागत नाही.शाॅर्टस तर अगदी कोच पोटॅटो करून टाकतात तुमचा !!!!   

   असो...

    यावर एका ठिकाणी असे वाचले की आपण उपास करतो तसाच आठवड्यातून/महिन्यातून एखादा दिवस तरी सोशल मिडीया न बघण्याचा उपास करून बघायचा.खरोखर कल्पना खूप आवडली. कितपत जमते ते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे...

    असा उपास ही एक उत्तमच गोष्ट आहे पण अजून एक जपानी संकल्पना आहे ती ही खूप आवडली. ती आहे "इकिगाई"...

     इकिगाई म्हणजे "a reason for being"- जगण्याचे कारण !! 

       रोज सकाळी उठल्यावर कोणत्या कारणाने/विचाराने जागे होता तेच तुमच्या हातून घडते.

     आपली इकिगाई आपणच शोधायची असते. आपल्याला काय करायला आवडते, कशात गती आहे,त्याचा उपयोग काय आणि शेवटचे म्हणजे अगदी अर्थार्जन ही होवू शकते कां...

       अर्थात इकिगाई वयानुसार बदलते. एखाद्याला अर्थार्जन महत्वाचे असते तर विद्यार्थ्याला मार्क मिळवणे. आपल्या वयानुसार, गरजेनुसार इकिगाई ठरवता येते.

      प्रत्येकाची आवड,गरज वेगवेगळी असते. त्यानुसार इकिगाई ठरते. जसे की वाचन,लेखन, स्वयंपाक, विणकाम, बागकाम  फिरणे असे अगदी काहीही !!! 

    आपली इकिगाई आपणच शोधून काढायची असते...


वीणा कुलकर्णी. 🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!