बाॅम्बे टाॅकीज, मालाड

    मालाड पश्चिमेतील सोमवार बाजार या भागात सुप्रसिद्ध निर्माते हिमांशू राय व नायिका देविका राणी यांचा बाॅम्बे टाॅकीज हा सिने निर्मितीचा स्टुडिओ होता. खूप सुंदर बांधकाम असलेल्या ह्या अप्रतिम कलाकृती कालौघात नष्ट पावल्या. 

    पण तिथून थोडे जवळच देविका राणी यांचा खूप सुंदर बंगला होता. जो सोडून जाताना त्यांनी तो मुंबई महानगरपालिकेच्या कन्या शाळेसाठी दिला. एक अगदी सुंदर इमारत अगदी आत्ता आत्ता पर्यंत वापरात होती. मुली तेथे शिकून प्रगती करत होत्या. मी ही त्या बंगल्याचे सौंदर्य जवळून न्याहाळले आहे. त्यामुळेच जेव्हा त्याला तोडले तेव्हा साहजिकच खूप वाईट वाटले. तुटता तुटत नव्हता म्हणे,एवढे मजबूत बांधकाम होते जुन्या काळचे !! 

      कालौघात नष्ट झालेल्या अशा अनेक इमारतींची उदाहरणे देता येतील कारण आपल्याकडे विकासाच्या नावाखाली अशा खूप गोष्टी होत आहेत. तर असो...आपण चांगल्याच गोष्टी बघूया.

     भारतातील खासकरून दक्षिणेकडील मंदिरे पुरातन आणि कलाकुसरीने भरलेली आहेत.

     भारतातील तसेच देशाबाहेरील अशी पुरातन सुंदर मंदिरे प्रवीण मोहन आपल्याला युट्यूब व फेसबुक या माध्यमांतून खूप छान पध्दतीने दाखवत असतोच. पण एक लियान रिचर्ड नावाचा ऑस्ट्रेलियन आहे. त्याचे ही व्हिडिओज बघण्यासारखे आहेत.तो ही भारतातील तसेच बाहेरील मंदिरांना त्यावरील कलाकुसरींना खूप छान पध्दतीने सादर करतो. एकदा एका दक्षिण भारतातील देवळात एका मूर्तीच्या हातात त्याला दुर्बिण दिसली,ती ही त्याने दाखवली.  

    असे काही वेगळेच बघितले की ज्ञानात भर पडल्यासारखे वाटते.



वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन