मिसिंग टाइल सिंड्रोम

    डेनीन प्रेगर यांनी 'मिसिंग टाइल सिंड्रोम' असे नाव दिलेली एक मानसिक प्रवृत्ती आहे. 

    म्हणजे व्यक्ती आपल्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींकडे न बघता नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे ती व्यक्ती दुःखी होते, मनातल्यामनात कुढत रहाते.

     एखादा सुंदर हाॅल असेल,जो हजारो सुंदर टाईल्स नी मढवलेला असेल पण तेथे एक टाइल लावायची राहिली अथवा तुटली असेल तर तेथे येणाऱ्या लोकांचे लक्ष इतर सुंदर टाईल्स पेक्षा त्या नसलेल्या टाइल कडेच जाते.

    तसेच एक सुंदर पोहण्याचा तलाव आहे, तेथेही तशीच एक मिसिंग टाइल आहे. तेथेही तेच !! तिकडेच सगळ्यांचे लक्ष जाते.

    म्हणजे माणसे सुख सोडून रिकाम्या जागेकडेच, दुःखा कडेच बघतात. ती एक प्रवृत्ती असते.

    कितीही यश मिळले, सुख-समाधान असले तरी इतरांच्या आयुष्याशी तुलना करून दुःखी होतात,उदास होतात. त्यामुळे जगण्यातला आनंद हिरावला जातो,मानसिक ताण वाढतो आणि कशातही समाधान मिळत नाही.

    अर्थात सगळ्यांना असेच होते असे नाही पण क्वचित प्रसंगी उगाचच उदास वाटते, असमाधानी वाटते.

    मग त्यावर उपाय आहेच की, आपल्याला मिळालेल्या अनेक सुंदर गोष्टींबद्दल देवाच्या, आईवडिलांच्या तसेच इतर जवळच्या लोकांप्रती कृतज्ञता ठेवा. आज आपण जे काही आहोत त्याला खूपजण कारणीभूत आहेत याची जाणीव ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

    दुसर्‍यांशी तुलना करणे टाळले पाहिजे. आणि परिपूर्णतेचा ध्यास न धरता, मिसिंग टाइल कडे न बघता ,आहेत त्या गोष्टींमधे समाधान मानायला शिकले पाहिजे.

    खूप अशीही माणसे आहेत जी मस्त मजेत जगत असतात तसे जगायला शिकायचे...

बघा जीवन किती सुंदर व आनंदी आहे. 


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. वसंत फडकेMay 6, 2026 at 6:27 PM

    अगदी खरं, आपल्याला एव्हढं काही मिळालेलं असतं, त्याकडे बघितलं आई वडील, भावंड, मित्रपरिवार, समाज आणि परमेश्वर यांचे आभार मानून जगलं तर......
    आयुष्य खूपच सोपं आणि सुंदर होते ...
    👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!