खरे-खोटे

    "सोम साळी, मंगळ जाळी

       बुध, भेसा नवं नेसा

        शुक्रवारी काय पुसा

        शनी साडा कधी न पडे खाडा"

नवीन वस्र कोणत्या दिवशी परिधान करावे ते सांगणारे हे एक लोकगीत. 

तशीच अजून एक मजा, घरापुढे, अंगणात वगैरे किती साळुंख्या दिसतात त्यावर पण इंग्रजीतून..

       One for sorrow 

       Two for joy

       Three for letter and

       Four for boy. 

    म्हणजे या सगळ्या लोकगीत,  गाणी-गप्पा आणि त्यावर असणाऱ्या (अंध) श्रध्दा अगदी युनिव्हर्सल आहेत तर !! 

     मजा सोडून देवूयात  पण अजून ही या वयात देखील नवीन साडी अथवा ड्रेस घालायचा म्हटला की आज काय वार आहे हे बघितले जाते. अर्थात त्याचे किती पालन होते तो मुद्दा अलाहिदा...

     तेच साळुंख्यांबद्दल. त्या दिसल्यावर अगोदर ती वरील कविता आठवते. आणि एकच दिसली की मनाला उगाचच चुटपुट लागते. नंतर दिवसभरात कामाच्या गडबडीत ती विसरली ही जाते.

     पण लहानपणापासून ऐकलेल्या अशा अनेक गोष्टी , गीतांचा मनावर नकळत परिणाम होत असतो.

    लहानपणी यातील किती खरे किती खोटे हे शोधण्याच्या फंदात आपण पडत नाही पण मोठे झालो की यातील फोलपणा लक्षात येतो आणि नुसती मजा वाटते. 

    पण खरंच कधी दिवसभरात काही थोडेसे जरी वाईट घडले की ती सकाळी बघितलेली एक साळुंखी आठवते एवढे नक्कीच. 


वीणा कुलकर्णी 🙏

Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!