सुग्रीवाज् ॲटलास

      श्री प्रभू रामचंद्रांची प्रिय पत्नी सीतामाई यांचे रावणाने अपहरण केल्यानंतर श्रीराम वेड्या सारखे सगळीकडे त्यांना शोधत होते. 

       श्री हनुमानांनी त्यांची भेट सुग्रीवा जवळ करून दिली. त्या काळात ही सुग्रीवाला चारी दिशांची पूर्ण माहिती होती म्हणून त्यांनी चारही दिशांना दूत पाठवून सीतामाईंचा शोध घेण्याचे ठरवले. 

      आणि याच चारी दिशांची माहिती व त्याची आधुनिक ठिकाणांशी घातलेली सांगड म्हणजे हे पुस्तक आहे... सुग्रीवाज् ॲटलास जे मराठीत ही सकाळ प्रकाशन यांच्या तर्फे प्रकाशित झाले आहे. 

       या पुस्तकाचे लेखक आहेत श्री निलेश निळकंठ ओक आणि दिपाली पाटवदकर.

      श्री निलेश ओक हे आपल्या प्राचीन ग्रंथांचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी सखोल अभ्यासानंतर रामायण व महाभारत कधी घडले त्या तारखा, तसेच प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्या जन्मतारखा इत्यादी गोष्टी पुराव्यांसहित दाखवून दिल्या आहेत. 

      श्री निलेश ओकांचे या विषयांवरील अनेक व्हिडिओज युट्यूब वर आपल्याला पाहायला मिळतात. Sangam talks नावाच्या युट्यूब चॅनल वर सुग्रीवाज् ॲटलास पार्ट 1 व 2 पहायला मिळतात जे ऐकून आपण सुग्रीवाच्या चारी दिशां बद्दल ची माहिती ऐकून आश्चर्याने अक्षरशः थक्क होतो. व नतमस्तक होतो. अर्थात हे दोन्ही व्हिडिओज इंग्लिश मध्ये आहेत पण त्यांचे अनेक व्हिडिओज मराठीत ही उपलब्ध आहेत ज्यात हा विषय ही चर्चिला गेला आहे.

       हे दोन ही व्हिडिओज ऐकल्यानंतर अत्यंत उत्सुकतेपोटी मी माझ्याकडे असलेले अनुवादक व संपादक डाॅक्टर प्र.ग.जोशी लिखित श्रीवाल्मिकिरामायण मराठी अनुवाद खंड दुसरा मुद्दामहून उघडून त्यातील किष्किंधा कांड पुनः वाचले.त्यात सर्ग चाळीस पासून पुढे अठ्ठेचाळीस पर्यंत वाचताना व त्याची निलेश ओकांच्या व्हिडिओज बरोबर सांगड घालताना आपण खूपच उत्साहित होत जातो व नवीन काहीतरी जणू आपणच शोधले असा आनंद निर्माण होतो. 

      हा आनंद आपण सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती. 🙏

श्रीराम जय राम जय जय राम. 


वीणा कुलकर्णी




Comments

  1. नक्की you tube वर पाहीन. नविन काम. पण आवडते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन