Posts

फिबोनाची

Image
   निसर्गात आपण बघतो तर निरनिराळ्या फुले,पाने,झाडे यांना एक विशिष्ट रचना असते. काही फुले तीन पाकळ्यांची तर काही पाच पण एकाच प्रकारच्या फुलांची एकच रचना !!     तेच पानांचे, फळांचे, झाडांचे अगदी शंख, शिंपले आणि समुद्राच्या लाटांचे ही.      उत्सुकतेपोटी ह्या रचनांमागचे गूढ शोधण्यासाठी गुगल वरती शोधले आणि त्यावर मिळालेली खालील माहिती खूपच रंजक आहे.      फिबोनाची क्रममालिका म्हणजे गणित आणि निसर्गात आढळणाऱ्या संख्यांचा विशेष क्रम आहे. ज्यामध्ये पुढील संख्या ही तिच्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज करून मिळते. हा क्रम 0 आणि १ पासून सुरू होतो. 0, १, १, २, ३, ५, ८, १३ आणि पुढे अनंत काळ चालतो.       या पध्दतीचा उगम भारतात झाला. इ.स. २00 मध्ये सर्वप्रथम पिंगला या प्राचीन भारतीय संगीतकार आणि गणिततज्ञ यांच्या  कार्यात आढळला. त्यानंतर इ.स. ६ ते ८ आणि १२ व्या शतकात विरंहक आणि जैन विद्वान हेमंतचंद्र या विद्वानांनी हा संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे नोंदवला.      फुलांच्या पाकळ्यांची संख्या याच फि...

खरे-खोटे

    "सोम साळी, मंगळ जाळी        बुध, भेसा नवं नेसा         शुक्रवारी काय पुसा         शनी साडा कधी न पडे खाडा" नवीन वस्र कोणत्या दिवशी परिधान करावे ते सांगणारे हे एक लोकगीत.  तशीच अजून एक मजा, घरापुढे, अंगणात वगैरे किती साळुंख्या दिसतात त्यावर पण इंग्रजीतून..        One for sorrow         Two for joy        Three for letter and        Four for boy.      म्हणजे या सगळ्या लोकगीत,  गाणी-गप्पा आणि त्यावर असणाऱ्या (अंध) श्रध्दा अगदी युनिव्हर्सल आहेत तर !!       मजा सोडून देवूयात  पण अजून ही या वयात देखील नवीन साडी अथवा ड्रेस घालायचा म्हटला की आज काय वार आहे हे बघितले जाते. अर्थात त्याचे किती पालन होते तो मुद्दा अलाहिदा...      तेच साळुंख्यांबद्दल. त्या दिसल्यावर अगोदर ती वरील कविता आठवते. आणि एकच दिसली की मनाला उगाचच चुटपुट लागते. नंतर दिवसभरात कामाच्या गडबडीत ती विसरली ही जा...

वेद-पुराणे

      एका ठिकाणी वाचले होते की भारतीय परंपरेनुसार शिष्याने गुरूंना प्रश्न विचारायचे नसतात. गुरू जी आज्ञा करतील ती शिरसावंद्य मानायची.       याउलट एका शास्त्रज्ञाची गोष्ट वाचली होती. ते शाळेत जाणारा मुलगा असताना त्यांची आई रोज ते शाळेतून घरी आले की एक प्रश्न विचारायची, आज तू शिक्षकांना काय प्रश्न विचारलास. त्यामुळेच त्या जिज्ञासेतून, कुतूहलातून एक शास्त्रज्ञ जन्माला आला.      अनेकवेळा पाहूनही समाधान न झालेले दोन इंग्लिश सिनेमे आहेत,  Avatar पहिला आणि Doctor Strange.          हे दोनही पिक्चर मला आपल्या संस्कृतीशी खूप जवळचे वाटतात. मला नक्की असे वाटते की त्या सिनेमांच्या लेखकांनी आपल्या वेद  पुराणांचा नक्कीच अभ्यास केला असावा. अवतार मध्ये दाखवलेला परकाया प्रवेश आणि डॉक्टर स्ट्रेंज मध्ये दाखवलेली श्रीयंत्र सदृश्य दृश्ये तसेच आपल्या शरीरातील सात आज्ञाचक्रांचा उल्लेख बघून मला तरी तसे वाटते.       अजून ही प्रेमकथां मध्येच अडकलेल्या बाॅलीवूड बद्दल न बोललेलेच बरे. साऊथ बद्दल विशेष माहिती नाही पण क...

अनामिक भिती

      नरसापूर मधील चिमुरडी च्या भयंकर अत्याचार दुर्घटनेतून जरा सावरतोय तेवढ्यात ट्रेन मधील मयांक लोहार आणि लोहगडावरील केतन अगरवाल दुर्घटना लागोपाठ डोक्यावर आदळल्या.       मन विषण्ण झाले आणि विचारशक्ती सुन्न पडली. आणि पुनः एकदा त्या अनामिक भितीने डोके वर काढले. काय चालले हे सगळीकडे ?? अशिक्षिता पासून सुशिक्षिता पर्यंत सगळे तसेच...कुणीच सुसंस्कृत नाही का ? या सगळ्यात एक वाईट गोष्ट घडताना दिसत आहे ती म्हणजे माणसांचा एकमेकांवरील विश्वास ढळू लागला आहे.      माझ्या यजमानांचे निधन झाल्यानंतर घरात आम्ही दोघीच.. मी आणि माझी मुलगी. रात्रंदिवस बेचैनी असे. तरूण मुलगी आणि मी ही शेवटी बाईच !! आयुष्यात कधी नव्हे ती बाईपणाची भिती वाटत असे तेव्हा... अनेक वर्षं नोकरीनिमित्त घराबाहेर पडून ही...      बॅक, शेअर्स इत्यादी कामासंदर्भात कधीतरी कुणी येत असेच. तसेच  प्लंबर, इलेक्ट्रिशियन सारख्या माणसांची ही गरज असतेच.       अर्थात चांगलीच माणसे मिळत गेली आणि भितीही नाहीशी झाली.    पण नुसता मोबाईल ला धक्का लागला तर माही...

इंटरनेट उपवास

     परवा आमच्या वसंत फडके नावाच्या मित्राने निर्जला एकादशी बरोबर इंटरनेट उपवास ही केला. ही सुंदर कल्पना मनाला खूपच भावली कारण हया इंटरनेट विस्फोट झालेल्या काळात या गोष्टींची खरंच खूप गरज आहे.       कारण फेसबुक,वाॅट्स ॲप,इ.इ. मुळे आपण खरंतर आभासी पध्दतीने जोडले गेलोय पण सर्वार्थाने 'जवळ' आलो आहोत का हा प्रश्नच आहे.       कारण फेसबुक वर वगैरे जे दाखवले जाते ते खरंच खरे असते का की नुसता दिखावा असतो ? हे असे म्हणावेसे वाटते कारण सध्या सगळीकडेच चर्चेत असलेली सिया गोयल... तिची सोशल मिडीया वेगळेच काही दाखवत होती आणि घडले काही वेगळेच होते..असो.      तुम्ही कोठेही जा, बहुतेक लोकांच्या हातात फोन असतातच.  बसथांब्यावर, बागेत अगदी दवाखान्यात ही लोक फोन बघत असतात. रस्त्यातून चालतानाही फोन बघत असतात, त्यातूनच माहीम ला एकावर हल्ला झाला. या सगळ्यात प्रत्यक्ष बोलणे कमी झाले आहे, सगळे ऑनलाईन लाईव्ह मात्र असतात.     मनोवैज्ञानिकानी हे सगळे काय चालले आहे त्याला नाव दिलेय Loneliness epidemic.     "Six Degrees of S...

Made in India: a TITAN story

    एक अप्रतिम कलाकृती म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे Prime video/MX Player या OTT चॅनेल वर सुरू असलेली ही मालिका.       महनीय जे.आर.डी. टाटांना स्वित्झर्लंड मध्ये ऐकवले गेले की, तुमच्या भारतात चांगली घड्याळे बनणे शक्य नाही.... आणि येथूनच स्फुलींग पेटले आणि सुरू झाला एक अद्भुत प्रवास. त्या वर विनय कामथ या लेखकांनी वरील पुस्तक लिहिले आणि त्याची बनलेली गोष्ट म्हणजे ही एक उत्तम वेब सेरीज.       या मालिकेतील प्रत्येक अगदी प्रत्येक कलाकर हा त्या भुमिके साठीच बनला आहे इतके उत्कृष्ट काम प्रत्येकाने केले आहे. कुणा एकाचे कौतुक करावे तर दुसर्‍यांवर अन्याय होईल. प्रत्येक पात्राच्या व्यक्तीरेखेत तुम्ही अक्षरशः गुंतून जाता,इतकी प्रभावी कामे केली आहेत.       "टाटा" हे नावच इतके मोठ्ठे, वलयांकित आहे की त्यावर आपण कलाकृती करत आहोत याचे उत्कृष्ट भान निर्मात्या पासून ही मालिका बनवणाऱ्या प्रत्येकाला आहे. आणि ही जाणीव इतकी तीव्र आहे की मालिकेची प्रत्येक फ्रेम केवळ बघत रहावी अशी झाली आहे. अनेकदा आनंदाने शरीरावर रोमांच उभे रहातात तर क...

॥ ईश्वराची दया ॥

   डोळ्यांनी बघतो, ध्वनी परीसतो कानी, पायी पदी चालतो ।     जिव्हेने रस चाखतो,मधुरही  वाचा मुखी बोलतो ।     हाताने बहुसाळ काम करतो विश्रांती ही घ्यावया ।     घेतो झोप सुखे, फिरूनी उठती ही ईश्वराची दया ॥      या एका श्लोकात त्या ईश्वराची किमया सांगितली आहे. किती त्या जगन्नीयंता बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. कारण केवढे ते आश्चर्य आहे, त्या 'अज्ञाता' वर गाढ विश्वास ठेवून आपण गाढ झोपून जातो.. उद्या नक्कीच उठण्यासाठी..     आणि ही त्याची जादूगारी फक्त माणसांबाबतच नाहीये तर जगातील सर्व प्राणी,पक्षी,वनस्पती इ.इ. सगळ्याच सजीव निर्जीव गोष्टींबाबत आहे.       पावश्या पक्षी माहित आहे नां? पाऊस जवळ आला की 'पेरते व्हा' असे ओरडत शेतकऱ्यांना पेरणीचा इशारा देतो. कुठून त्याला हे ज्ञान मिळते की पाऊस लवकरच पडणार आहे.        पाऊस जवळ येण्या आधीच सगळ्याच पक्ष्यांची घरटे बांधण्याची घाई उडते. मुंग्यांचा सुळसुळाट होतो, पावसा आधी वारूळात धान्य भरण्यासाठी !!!       मारूती चित्तमपल्ली...

कबुतर

    माझ्या मुलीने कबुतरा बद्दल एक गोष्ट सांगितली आणि मला ती खूपच पटली. कबुतरा बद्दल खूप वाईट ही वाटले.     माणसाने सुमारे ५ ते १० हजार वर्षांपूर्वी आपल्या कामासाठी कबुतराला माणसाळवले. गुगलबाबा सांगतो याची सुरुवात मेसोपेटोमिया येथून झाली. माणसाळवलेला तो सर्वात पहिला पक्षी आहे. मग ती रानावनात न रहाता, माणसांनी बनवून दिलेल्या घरात म्हणजेच खुराडी, पिंजरे अशाच ठिकाणी राहू लागली. माणसे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांची काळजी ही घेत होती व खायला प्यायला ही देत होती.        हळूहळू दळणवळणाची नवनवीन साधने उपलब्ध झाली आणि कबुतरांची गरज संपली. माणसांनी त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले. मग ती घरांच्या आडोशाला वगैरे राहू लागली. वर्षांनुवर्षांच्या गुलामगिरीमुळे ती झाडांवर घरटी बांधणे विसरूनच गेली होती. अशातच माणसांनीच त्यांच्यासाठी कबुतरखाने बनवले आणि त्यांच्या रहाण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली. तशीही माणसांजवळ रहाण्याची सवय असल्यामुळे ,ती माणसांच्या आसपासच घुटमळत राहिली.      वाढत्या प्रदुषणात, कबुतरांमुळेही श्वसनविकार होतात याच...

मदत

    काल वाॅटस् ॲप वर एक गोष्ट वाचनात आली. एक महिला आजारी असते. ती एकदा अचानकपणे तिच्या वर्गमित्राला भेटते. आता शाळा सोडून जवळपास पन्नास वर्षं उलटून गेलेली असतात. तरीही तो आधुनिक सोशल मिडीयाच्या मदतीने वर्गातील जमतील तेवढ्या मित्र मैत्रीणींचा गृप बनवतो. त्या आजारी मैत्रीणीच्या नकळत,ती दुखावली जाणार नाही अशा पध्दतीने,तिच्या नवर्‍याच्याच मदतीने जवळच एक गेटटुगेदर ठरवतात.      ती सर्वांना भेटते. खूप खुश होते. मित्र मैत्रीणींची मनापासून केलेली मेहनत कामी येते. नंतर जमेल तशी मदत सगळेजण तिला करू लागतात. नवर्‍याच्या उत्तम सांपत्तिक स्थिती मुळे तसा पैशाचा प्रश्न नसतो. हवी असते ती शारीरिक आणि मुख्य म्हणजे मानसिक साथ !! ती मिळाल्यामुळे हळूहळू तिची तब्येत बर्‍यापैकी सुधारू लागते.      ही गोष्ट वाॅट्स ॲप वर आलेली... किती खरी,किती खोटी माहित नाही. पण संकल्पना खूप आवडली.     सलील कुलकर्णी यांचा एक लेख वाचनात आला होता. पुण्यात खूपसे पालक एकटे राहतात. कारण मुले परदेशी अथवा नोकरी निमित्ताने बाहेरगावी असतात म्हणून. मग पुण्यात अशी एक संस्था आहे जी अशा व...

संभव-असंभव

      श्रीमद्भगवतगीता अध्याय २ श्लोक २३: नैनं छिन्दन्ति शस्राणि, नैनं दहति पावकः | न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारूतः || हा श्लोक सर्वांनाच माहित आहे. आत्मा अमर आहे,तो पुनः पुनः शरीर बदलत असतो,त्याला मरण नाही.    हे अबाधित सत्य असले तरी आपले जीवन मात्र क्षणभंगुर, नश्वर आहे. आपण आज आहोत तर उद्याची शाश्वती नाही हे त्रिकालाबाधित सत्य मनुष्य जन्माला येतो तेव्हाच ठरलेले असते. तरीही आपण राग-लोभ, हेवेदावे,तुझे,माझे करण्यात आणि जीवनाच्या आसक्तीतच अडकून पडलेले असतो. माझा उद्या नक्कीच उजाडेल हे किती सहजपणे आपण गृहीत धरून चालत असतो !!!       साधारण २००७ - २००९ मध्ये झी वाहिनीवर "असंभव" नावाची एक अद्भुत मालिका लागत असे त्याची आठवण आली. तशी ती आत्ताही युट्यूब वर उपलब्ध आहेच. त्याचे शीर्षकगीत असे होते - दिवसामागूनी रात्र धावते, सकाळ संध्याकाळ,  सूत्रधार या साऱ्या चा नाव तयाचे काय ?  काय तयाच्या मनात दडले, न कळे कधी,कुणा क्षणात होते संभव सारे, क्षणापूर्वीचे असंभव!!      खरंच कोण आहे तो सूत्रधार, जो हा जगाचा पसारा निर्विकारपणे चा...

मिसिंग टाइल सिंड्रोम

    डेनीन प्रेगर यांनी 'मिसिंग टाइल सिंड्रोम' असे नाव दिलेली एक मानसिक प्रवृत्ती आहे.      म्हणजे व्यक्ती आपल्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींकडे न बघता नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे ती व्यक्ती दुःखी होते, मनातल्यामनात कुढत रहाते.      एखादा सुंदर हाॅल असेल,जो हजारो सुंदर टाईल्स नी मढवलेला असेल पण तेथे एक टाइल लावायची राहिली अथवा तुटली असेल तर तेथे येणाऱ्या लोकांचे लक्ष इतर सुंदर टाईल्स पेक्षा त्या नसलेल्या टाइल कडेच जाते.     तसेच एक सुंदर पोहण्याचा तलाव आहे, तेथेही तशीच एक मिसिंग टाइल आहे. तेथेही तेच !! तिकडेच सगळ्यांचे लक्ष जाते.     म्हणजे माणसे सुख सोडून रिकाम्या जागेकडेच, दुःखा कडेच बघतात. ती एक प्रवृत्ती असते.     कितीही यश मिळले, सुख-समाधान असले तरी इतरांच्या आयुष्याशी तुलना करून दुःखी होतात,उदास होतात. त्यामुळे जगण्यातला आनंद हिरावला जातो,मानसिक ताण वाढतो आणि कशातही समाधान मिळत नाही.     अर्थात सगळ्यांना असेच होते असे नाही पण क्वचित प्रसंगी उगाचच उदास वाटते, असमाधानी वाटते. ...

बाॅम्बे टाॅकीज, मालाड

    मालाड पश्चिमेतील सोमवार बाजार या भागात सुप्रसिद्ध निर्माते हिमांशू राय व नायिका देविका राणी यांचा बाॅम्बे टाॅकीज हा सिने निर्मितीचा स्टुडिओ होता. खूप सुंदर बांधकाम असलेल्या ह्या अप्रतिम कलाकृती कालौघात नष्ट पावल्या.      पण तिथून थोडे जवळच देविका राणी यांचा खूप सुंदर बंगला होता. जो सोडून जाताना त्यांनी तो मुंबई महानगरपालिकेच्या कन्या शाळेसाठी दिला. एक अगदी सुंदर इमारत अगदी आत्ता आत्ता पर्यंत वापरात होती. मुली तेथे शिकून प्रगती करत होत्या. मी ही त्या बंगल्याचे सौंदर्य जवळून न्याहाळले आहे. त्यामुळेच जेव्हा त्याला तोडले तेव्हा साहजिकच खूप वाईट वाटले. तुटता तुटत नव्हता म्हणे,एवढे मजबूत बांधकाम होते जुन्या काळचे !!        कालौघात नष्ट झालेल्या अशा अनेक इमारतींची उदाहरणे देता येतील कारण आपल्याकडे विकासाच्या नावाखाली अशा खूप गोष्टी होत आहेत. तर असो...आपण चांगल्याच गोष्टी बघूया.      भारतातील खासकरून दक्षिणेकडील मंदिरे पुरातन आणि कलाकुसरीने भरलेली आहेत.      भारतातील तसेच देशाबाहेरील अशी पुरातन सुंदर मंदिरे प्रवीण मो...

इकिगाई

  आमच्या घरासमोरच्या इमारतीत मेंटेनन्सचे काम सुरू होत आहे. त्यासाठी बांबू बांधणारे कामगार त्यांचे काम करत आहेत, नेहमीप्रमाणेच.. बिनधास्त!!!!     त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,ते कामगार इतक्या उंचीवर  इतके बिनधास्त वावरत होते की अगदी मध्येच एखाद्या बांबूवर झुलत बसून फोनही पाहिला एकदा एकाने असे वाटले, हे सगळे पहाताना इकडे माझ्याच काळजाचा ठोका चुकत होता.    हल्ली सगळीकडेच सोशल मिडीयाचा अतिरेक झाला आहे. व्हिडिओ, रिल्स बघता बघता तुमचा वेळ कधी, कुठे आणि कसा जातो याचा पत्ताच लागत नाही.शाॅर्टस तर अगदी कोच पोटॅटो करून टाकतात तुमचा !!!!       असो...     यावर एका ठिकाणी असे वाचले की आपण उपास करतो तसाच आठवड्यातून/महिन्यातून एखादा दिवस तरी सोशल मिडीया न बघण्याचा उपास करून बघायचा.खरोखर कल्पना खूप आवडली. कितपत जमते ते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे...     असा उपास ही एक उत्तमच गोष्ट आहे पण अजून एक जपानी संकल्पना आहे ती ही खूप आवडली. ती आहे "इकिगाई"...      इकिगाई म्हणजे "a reason for being"- जगण्याचे कारण...

कौतुक

   "जातस्य हि ध्रुवो मृत्यु:"  ( भगवद्गतगीता  २.२७ )     हे त्रिकालाबाधित सत्य सर्वांनाच माहित आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव नक्कीच मृत्यू पावणार आहे.       हे माहित असूनही बहुतांश लोक, (माझ्यासहित), मी,माझे च करत असतात. राग,लोभ सारख्या षड्रिपूं मध्येच अडकून राहिलेले असतात.       स्वत: पलिकडे माणसाला खरचं काही दिसत नाही कां ??       कधीतरी समोरच्याचे मनापासून कौतुक करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे फार कमी वेळेला होताना दिसते.     पल्लवी जोशी निवेदन करत होती तो सारेगमप कार्यक्रम आठवतोय ? किती ती छान बोलत असायची !!! सगळ्यांचे कौतुक तिच्या  शब्दाशब्दातून अगदी ओसंडून वाहत असायचे. भले ते लिहून दिलेले असेल पण किती ते खरे आणि छान वाटायचे. लेखकाचेही कौतुक!!!!!       एकंदरीतच आपण भारतीय माणसे भावना व्यक्त करणे कमजोरपणाचेच लक्षण मानतो असे मला वाटते. असो...       तसे तर नाट्यगृहात ही ते वेगळ्याच प्रमाणात दिसते. पुढच्या रांगांमधील प्रेक्षक माफक प्रतिक्रिया देत असतात. तर श...

गीता वचन

    श्रद्धेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर एक क्लीप ऐकण्यात आली.      त्यात असे म्हटले आहे की, श्रद्धेने तुम्ही मेडीटेशन करत असाल तर त्याचा खूपच सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर, तब्येतीवर होतो.     मेडीटेशन करत असताना चांगल्या विचारांचे, तब्येत ठीक होण्याचे असे काही ठोस ध्येय समोर ठेवून जर तुम्ही मनाची शक्ती वाढवलीत तर तुमचे आरोग्य, मन चांगले रहाते, सुधारते.     त्यासाठी त्या क्लीप मध्ये गीतेच्या  १५  व्या अध्यायातील  ५  व्या श्लोकाचे उच्चारण केले आहे. तुम्ही मनाला  पंचेंद्रियांना जिंकून घेवू शकता इतकी शक्ती मेडीटेशन मध्ये आहे.     गीता अध्याय  १५  श्लोक  ५  वा :  "ज्यांचा मान आणि मोह नष्ट झाला आहे,ज्यांनी आसक्तीरूपी दोष जिंकला आहे, जे नित्य परमात्म्याच्या स्वरूपात स्थित आहेत, ज्यांच्या कामना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत आणि जे सुख-दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त आहेत, असे ज्ञानी पुरूष त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतात." रामकृष्ण हरी 🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏

कलीयुगाची पूर्वसूचना

    सध्या सगळीकडेच युध्दाच्या बातम्या ऐकू येत आहेत.त्या संदर्भात एक गोष्ट आठवली.      महाभारत युध्द समाप्ती नंतर कलीयुगाची सुरवात होणार असते. कली लोकांच्या डोक्यात शिरून विध्वंसाची सुरुवात करणार असतो. त्या पार्श्वभूमीवर पांडवानी भगवान श्रीकृष्णांना विचारले कलीयुगात कशी परिस्थिती असेल यावर भगवानानी चार दिशांना चार बाण फेकले व ते त्यांना आणावयास सांगितले.        अर्जुन ज्या दिशेला पोचला तेथे जे दृश्य दिसले त्याने तो थक्क झाला. एक मैना मंजुळ आवाजात गात होती. पण गाता गाता ती एका जिवंत सशाचे लचके तोडून खात होती.      भीमाने ही आपल्या दिशेला पोचल्यावर जे पाहिले ते ही थक्क करणारे होते. चार पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरींच्या मध्ये एक विहीर होती,ती मात्र कोरडी ठाक होती.      नकुलाला असे दिसले की, एक गाय आपल्या नुकत्याच जन्म दिलेल्या वासराला चाटत होती पण तीने त्याला इतके चाटले की त्याची कातडी सोलवटली. शेवटी लोकांनी त्याला तिच्यापासून दूर केले.      सहदेवाला एक मोठा दगड डोंगरावरून गडगडत येताना दिसला. तो वाट...

अशीच एक गोष्ट

    ती सुंदर राजकन्या आणि बेडूक झालेल्या शापित राजपुत्राची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझी गोष्ट थोडी वेगळीच आहे. छान, गंमतशीर अजिबात नाहीये.      तर आपली ही नवीन राजकन्या अशीच फेरफटका मारत बागेत फिरत असते. तेवढ्यात तिला एक चांगला जाडा,काळपट हिरवा बेडूक तलावाकाठी बसलेला दिसतो. ती त्याच्याकडे जाऊ लागते......      तिला जवळ येताना बघून तो मनोमन खूप खुश होतो.....    आता ती येणार,आपल्याला उचलणार आणि आपले तिच्या सुंदर  ओठांनी चुंबन घेताच आपण शापमुक्त होऊ आणि नंतर तिच्याजवळ विवाह करून आपल्या राज्यात राज्य करू....      ती येते,त्याला उचलते आणि स्वतःजवळच्या पिशवीत ठेवते. मग ती घरी येते त्या बेडकाला स्वच्छ धुते, निगुतीने सगळीकडून त्याला छान कापते व त्याच्या मांड्यांचा चमचमीत रस्सा करून चाटून पुसून खाते....    संपली गोष्ट....     मलाही लिहीताना खूप वाईट वाटले पण साधारण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी हा व्यवसाय खूप भरभराटीला आला होता. आताही असेल तर मला माहीत नाही.      बेडकांच्या मांड्या चीनला...

देव पुनः एकदा

     एपिस्टाईन फाईल्स च्या गदारोळामुळे देव आहे की नाही हा संभ्रम मनात तयार झाला. आणि मनानेच त्याला 'तो' आहेच हे ठाम उत्तर दिले.     आहेच की हो तो माणसा माणसात,  माणसातील चांगुलपणात, प्रेमात  !!!!     हल्ली ॲगनाॅस्टीक लोकांची संख्या वाढली असावी असे वाटते कारण कुठे तरी वाचले की एक सर्वेक्षण झाले त्यात म्हणे पन्नास टक्के लोक agnostic निघाले. म्हणजे त्यांना देव आहे ही वाटत नाही आणि नाही ही...न्यूट्रल, निर्विकार  !!!     यात अजून एक सांगायचे म्हणजे अजून एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे अमेरिकेत agnostic लोकांबरोबरच ऐथिस्ट म्हणजे देवाला न मानणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. आणि हे नक्कीच भितीदायक आहे.    कारण देवच नाही मग कसलेही चांगले वाईट काम करताना भिती कोणाचीच उरत नाही. अज्ञातातला देव बघतोय ही संकल्पनाही माणसाला वाईट मार्गापासून परावृत्त करत होती. पण एकदा देव नाहीच मग काय....कसेही वागा.     त्यामुळेच देव हवाच आणि तो आहेच.    पण आपल्याला सध्या तरी घाबरण्याची भिती नाही. कारण मोठ्या दोन तीन पिढ्या अनेक च...

देव

    सध्या सगळीकडेच इपिस्टाईन फाईल्स ची चर्चा चालू आहे. अर्थात त्यातले मला काही कळत नाही आणि कळून घेण्याची इच्छाही नाही. त्यामुळेच आजच्या लेखाचा तो विषयच नाही.     फक्त सांगण्यासारखे एक म्हणजे त्यात ज्या लोकांची नावे सगळीकडे चर्चेत आहेत त्यामुळे धक्क्यावर धक्के मात्र नक्कीच बसत आहेत तर सांगण्याचा विषय असा की हे सगळे काय चालत आले आहे...मनाला सुन्न करणारे !!!!     अगदी विचार केला तर चेंगीझ खान किंवा त्याआधी पासूनच आणि नंतर ही देशोदेशी झालेले अनेक नरसंहार, ज्यूं चे आणि फाळणीच्या वेळचे नरसंहार आणि आता या फाईल्स मधून उघड होत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टींमुळे मती कुंठीत झाली आहे, काही कळतच नाहीये....      लहान बाळांपासून स्त्रीपुरूष, म्हातारे कोतारे अगदी सगळ्यांवरचे अत्याचार बघून मन सुन्न होते.    कुठे आहे देव ????? खरंच देव आहे का आणि असेल तर एवढ्या भयानक घटना तो घडूच का देत आहे ??    खरंतर मन विषण्ण झाल्यावर सारासार विवेक बुध्दी जागृत होते. सकारात्मक विचारच केले पाहिजेत व अशा भयानक बातम्यांपासून मनाला लांब ठेवले पाहिजे हे कळत...

कोकण

   आपल्यातील खूप जणांचे मूळ कोकणाशी जोडले गेले आहे त्यामुळे कोकणाबद्दल एक वेगळीच आत्मीयता आहे. खूप जणांचे तर लहानपण तेथे गेले आहे,त्यामुळे मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आजही पाळतो.जसे की सोमवारी डोक्यावरून आंघोळ करू नये,अमुक दिवशी तमुक करू नये इ.     रात्री झाडाखाली झोपू नये पण खरतर ही अंधश्रद्धा नाही. कारण रात्री झाडे कार्बन डाय ऑक्साईड सोडतात व ऑक्सिजन घेतात त्यामुळे झाडाखाली झोपणाऱ्याला श्वासाचा त्रास होऊ शकतो.    जुन्या लोकांना कदाचित सायन्स माहित नसेल पण निसर्गज्ञान होते.    या सर्व गोष्टींमधून सुचलेली एक गंमतशीर गोष्ट!!! मजेत मजेत वाचा आणि सोडून द्या ही विनंती.    लहानपणी असे ऐकलेले की झोपताना तहान लागली तर तसेच झोपू नये नाहीतर तहानलेला आत्मा पाणी शोधत शरीरातून बाहेर पडतो. खरतर डिहायड्रेशन होते हे खरे कारण !!!!    तर, या गावातल्या काकूंना झोपताना तहान लागली पण उठायचा आळस केला आणि झोपून गेल्या.....     झाले !!! रात्री पडला की हो आत्मा शरीरातून बाहेर....    स्वयंपाकघरात गेला तर नेमकी एक कळश...